News-Details

*डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा*

| Date: 2025-09-24


इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेब आणि मा. सचिव, कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या सहकार्याने डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह मध्ये दिनांक 24 .9 .2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करून कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा .मुकेश बाभुळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पि.के देशमुख शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. व्ही. एस.अढाव तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .मंगेश देवकर ,राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अनंता तितरे प्रा.भावेश मांडवाले, महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. साक्षी पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे सुरुवात कशी झाली राष्ट्रीय सेवा योजनेचे चिन्ह त्याचा अर्थ व राष्ट्रीय सेवा योजनेचे समाजासाठी असलेले महत्त्वपूर्ण कार्य व महत्त्व प्रमुख पाहुणे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले राष्ट्रीय सप्ताह दिनांक 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर सुरू असलेले वेगवेगळे उपक्रम त्यामध्ये दिनांक 22 सप्टेंबर रोजी उपक्रमामध्ये विद्यार्थी प्रिय प्राध्यापकांची निवड हा विषय होता या उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रिय प्राध्यापक म्हणून फार्माकॉग्नोसी विभागाचे प्रा. श्री विकास घाईट यांची निवड केली मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार घेऊन त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय एकाची भावना सर्वांच्या मनात रुजून रहावी त्यासाठी ऑपरेशन सिंदूर यावरती चित्रफित दाखवण्यात आली .त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ. अढाव सर यांनी राष्ट्रीय सेवाभाव यांच्या विषयी जागृती असावी असा संदेश दिला राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून गेल्या मागील दोन वर्ष ज्यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा दिली त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अनंता तितरे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा सुरळकर व ऋतुजा देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे छायांकन अमरदीप सोनवणे व ओम कराळे यांनी केले.

Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help