| Date: 2026-08-12

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे PC-DIC यांच्या वतीने Glenmark, अकोला यांच्या सहकार्याने व श्री. वाहेद अली खान सर यांच्या समन्वयातून १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता उच्च रक्तदाब जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. पवन कुमार अग्रवाल, MD Medicine यांनी उच्च रक्तदाबाची कारणे, प्रतिबंध, नियमित रक्तदाब तपासणी व निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख, प्रा. आशिष राठी, डॉ. रितेश पोपट व डॉ. मंगेश देवकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा सुराडकर (B. Pharm अंतिम वर्ष) यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अंकुश मस्कर यांनी केले. छायाचित्रण वैभव भातुरकर (B. Pharm द्वितीय वर्ष) यांनी केले.
विद्यार्थी व उपस्थितांमध्ये उच्च रक्तदाबाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Connecting Aspirations, Engineering Excellence