| Date: 2025-06-09

दिनांक 23 ऑगस्ट 2024 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोलकत्ता मध्ये डॉक्टर वर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच बदलापूर मध्ये झालेल्या घटनेचा विरोधात निषेध व्यक्त करण्याकरिता न मोर्चा काढण्यात आला यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं अशा प्रकारच्या विकृतीच कडाडून विरोध करत या घटनेवर आधारित एक सामाजिक संदेश देणारं पथनाट्य सादर करण्यात आले त्यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अंजली तेलंग व सह विद्यार्थी प्रथमेश आगलावे सुदर्शन सदावर्ते, प्रथमेश जाधव व इतर यांचा समावेश होता महाविद्यालयाचे प्रा मंगेश देवकर तसेच प्रा अश्विनी झनके यांनी या निषेध मोर्चामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.सदर मोर्चाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पि. के देशमुख सर यांनी समर्थन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाचे विद्यार्थी रोहन माने यांनी केले छायाचित्रीकरण पियुष झोपे द्वारा करण्यात आले या निषेध मोर्चात प्रा मुकेश बाभुळकर प्रा अनंता तीतरे प्राध्यापक महेश नारखेडे डॉ पवन चिंचोले प्राध्यापक रितेश पोपट प्रा आशिष राठी प्रा शितल गांधी सहकारी महिला शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होऊन निषेध व्यक्त केला
Connecting Aspirations, Engineering Excellence