News-Details

डॉ राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे शिवजयंती ढोल ताशांच्या गजरात उत्साह साजरी

| Date: 2026-02-19


दरवर्षीप्रमाणे महाविद्यालयात शिवजयंतीचे विशेष आयोजन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने करण्यात आले
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक महाविद्यालयाच्या प्राणंगानामध्ये काढण्यात आली यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी पारंपारिक पद्धतीने श्रीराम ढोल पथक मलकापूर यांच्यासह
आणि अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा असलेली उत्तम प्रदर्शन करण्यात आले. मिरवणुकीनंतर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमापूजन आणि आरती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत देशमुख व शैक्षणिक व्यवस्थापक डॉ वैभव आढाव आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक मुकेश बाभूळकर यांच्या हस्ते करण्यात आली. डॉ मंगेश देवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणा मंत्र आणि शिवगर्जना केली. यानंतर सर्व ढोल पथकाचे स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांचे तीस फूट उंचीवरून स्थैल चित्राचे अनावरण महाविद्यालयाच्या इमारतीवरून करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोहार व्यवस्था विद्यार्थी परिषदेमार्फत महाविद्यालयाचे कर्मचारी श्री प्रवीण इंगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक रुंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहात हा आनंदाचा क्षण अनुभव करत होते. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याकरिता महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिकेत जंगले व प्राध्यापिका किरण गायकवाड यांनी ढोल ताशा पथकामध्ये ढोल वाजून सक्रिय सहभाग नोंदवला.सदर उत्साहाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेमार्फत करण्यात आले होते ही विद्यार्थी परिषद प्रमुख प्रेम सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिवजयंती उत्साहात साजरी केली.

Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help