News-Details

डॉ . राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा

| Date: 2026-09-25


डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे जागतिक औषधनिर्माता (फार्मासिस्ट) दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) च्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी हा दिवस विशेष स्वरूपात साजरा केला.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मलकापूर शहरातील विविध फार्मसी स्टोअर्सना भेट दिली. तेथे रुग्णांना औषधोपचारासंदर्भात समुपदेशन सेवा देण्यात आली. रुग्णांना औषधांचे योग्य सेवन, दुष्परिणाम व सावधानता याबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यावसायिक जबाबदारी व सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली.

याचवेळी महाविद्यालयाच्या विविध सामाजिक व प्रायोगिक कार्यक्रमांमध्ये आजपर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व फार्मासिस्टांना ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे प्रोत्साहन प्रशस्तीपत्र’ प्रदान करण्यात आले. यामुळे स्थानिक फार्मासिस्ट समुदायाचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख व शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव आढाव यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पीसीआयच्या मार्गदर्शक सूचीनुसार डॉ. पवन चिंचोली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची रूपरेषा डॉ. मंगेश देवकर यांनी आखली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अनंता तीतरे, प्रा. विकास घाईट व प्रा. किसन पवार प्रा साक्षी पाटील प्रा डॉ अंकुश मस्कर यांनी या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

या उपक्रमाद्वारे महाविद्यालयाने फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व अधोरेखित करत रुग्णसेवा व सामाजिक जाणीव यांना चालना दिली.

#pharmacistday #NssIndia #bpharmacy #mpharmacy #dpharmacy


Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help