डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा
| Date: 2025-11-27
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मुख्य अतिथी आणि व्याख्याते माननीय जी .एन .इंगळे जिल्हा कोषाध्यक्ष कास्ट tribe शिक्षक संघटना बुलढाणा तसेच तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मलकापूर सेवानिवृत्त शिक्षक विवेकानंद विद्यालय नरवेल हे लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारतीय संविधान पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथी यांच्या परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अनंत तीतरे यांनी करून दिला. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व व्याख्याते माननीय जी एन इंगळे यांनी संविधान निर्मिती मागच्या संपूर्ण घटनांचा उहापोह केला व संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्य याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क तसेच कर्तव्य याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी देशाचा सुजाण नागरिक म्हणून देश हितासाठी व देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमांमध्ये संविधानाची उद्देशिका वाचन डॉ मंगेश देवकर यांनी केले. तसेच संविधान दिवसाचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रशासक डॉ.वैभव आढाव प्रा. विकास घाईट, डॉ.अंकुश मस्कर, प्रा. साक्षी पाटील प्रा. श्वेता राणे व इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help