News-Details

डॉ.राजेंद्र गोडे महाविद्यालय फार्मसी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

| Date: 2026-05-01


डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संयुक्तपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत के. देशमुख यांच्या हस्ते ध्वज पूजनाने झाली. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. व राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र गीत गायण्यात आले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. व्ही. एस. आढाव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. प्रशांत के. देशमुख यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. त्यासोबतच कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या हक्कांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनंता तीतरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र दिन चिरायू होवो....!

Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help