News-Details

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे गांडूळ खत निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न

| Date: 2026-09-11


डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथील औषधी वनस्पती उद्यान व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या औषधी वनस्पती उद्यान परिसरात गांडूळ खत निर्मिती व व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सेंद्रिय शेती, नैसर्गिक खतांचा वापर आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे सर व सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून कु. दिपाली पागोरे मॅडम (प्राचार्य) तसेच प्रशांत उबाळे सर, कृषी तंत्र विद्यालय, मलकापूर उपस्थित होते. पागोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया, त्याचे व्यवस्थापन, विविध उपयोग तसेच नैसर्गिक शेतीतील त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन समन्वयक प्रा. विकास घाईट यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना त्यांनी आधुनिक जीवनशैली, पारंपरिक पद्धती आणि नैसर्गिक शेती यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून निरोगी व शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. देशमुख सर व शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव आढाव सर यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत NSS विद्यार्थी प्रतिनिधी पुनम हरणे व गौरव बुटे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSS प्रमुख प्रा. अनंता तीतरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मंगेश देवकर यांनी केले. कार्यक्रमास NSS चे सर्व स्वयंसेवक व अधिकारी प्रा. साक्षी पाटील, प्रा. श्वेता राणे, प्रा. मोहिनी क्षीरसागर, प्रा. अमित कुडके तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. औषधी वनस्पती उद्यानाची देखभाल तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. श्रीकृष्ण किंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help