| Date: 2026-06-11

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक नेत्रदान दिवस (१० जून २०२६) उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना संघटनेने नेत्रदानावर आधारित लघुपट दाखवून विद्यार्थी-शिक्षकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नेत्रदान कसे करावे याची सविस्तर माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश देवकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर होते. शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव आढाव यांनी नेत्रदान व त्याचे सामाजिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अनंता तीतरे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रथम वर्षाचे विद्यार्थी ओम घंगाळे यांनी केले.
नेत्रदान हा एक महान दान आहे, ज्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीला पुन्हा जगण्याची संधी मिळते, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला. विद्यार्थ्यांनी नेत्रदानासाठी पुढे यावे, असे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले
Connecting Aspirations, Engineering Excellence