News-Details

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहाने साजरी

| Date: 2026-04-14


डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश देवकर यांनी शिक्षण क्षेत्रात बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतिकारी योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. अनंता तीतरे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. पवन चिंचोले, डॉ. महेश नारखेडे, प्रा. किसन पवार, प्रा. भावेश मंडवाले, डॉ. अंकुश मस्कर, प्रा. साक्षी पाटील, शरद शिंदे, हर्षल पाटील, सर्व रा.से.यो. स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help