| Date: 2026-09-12

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे महाविद्यालयातील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम आणि रस्सीखेच या विविध खेळांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मैदानी खेळ नियमितपणे खेळावेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चिकाटी आणि संघभावना वाढीस लागते, असे त्यांनी अधोरेखित केले.
कॅरम स्पर्धेत मुलांमध्ये बी. फार्म तृतीय वर्षाचे विद्यार्थी भूषण घायाळ तर मुलींमध्ये कुमारी पायल आखरे विजेते ठरले. बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये आकांक्षा सोनार आणि मुलांमध्ये सागर सपकाळ यांनी विजेतेपद मिळवले. वेळेवर आलेल्या पावसामुळे मैदानी खेळांचे अंतिम सामने स्थगित करण्यात आले. हे सामने गणेश उत्सवानंतर पूर्ण होतील, अशी ग्वाही खेळ विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयश आमोदे यांनी दिली.
सर्व खेळांचे मार्गदर्शन व नियोजन खेळ विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश देवकर, प्रा. आनंदा तीतरे आणि प्रा. मोहिनी शिरसागर यांनी केले. रेफरी म्हणून प्रा. श्वेता राणे, प्रा. भावेश मंडवाले, प्रा. साक्षी पाटील, प्रा. वैभव पाटील आणि प्रा. विशाल पडघान प्रा विकास घाईट यांनी भूमिका निभावली. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Connecting Aspirations, Engineering Excellence