News-Details

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेचे आयोजन

| Date: 2026-09-04


डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे विद्यार्थी परिषद व विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या सहकार्याने विद्यार्थी प्रतिनिधी परिषद कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. योगेंद्रजी आर. गोडे, सचिव सौ. तन्वी वाय. गोडे आणि प्राचार्य डॉ. पी. के. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, क्षमता, मेहनत, बांधिलकी तसेच महाविद्यालयाप्रती असलेल्या जबाबदारीचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. प्रतीक्षा सुरळकर यांची महिला प्रतिनिधी, श्री. श्रेयश आमोदे यांची क्रीडा सचिव, श्री. अमरदीप सोनवणे यांची सरचिटणीस, कु. तनिषा भन्साली यांची सांस्कृतिक सचिव, कु. सोनम गणतीरे यांची राखीव प्रवर्ग प्रतिनिधी, श्री. दिग्विजय राजपूत यांची अध्यक्ष आणि श्री. आदित्य पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सल्लागार समितीतील सदस्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख व शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव अढाव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नवनिर्वाचित प्रतिनिधींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे समन्वयन विद्यार्थी परिषद व विद्यार्थी विकास कक्षाचे समन्वयक डॉ. मंगेश देवकर, NSS अधिकारी प्रा. अनंता तितरे तसेच निवडणूक अधिकारी प्रा. श्वेता राणे व प्रा. विशाल पडघान उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. रितेश पोपट( सांस्कृतिक विभाग प्रमुख) यांनी केले. सूत्रसंचालन आकांक्षा सोनार व गायत्री मोतळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. श्वेता राणे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help