News-Details

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे आर्थिक नियोजन व रोजगार संधी या विषयावर यशस्वी कार्यशाळा

| Date: 2026-08-12


डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) वतीने आर्थिक नियोजनाबाबत जागरूकता आणि आर्थिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एंजल वनचे वित्तीय सल्लागार अधिकारी श्री धीरज शर्मा उपस्थित होते. त्यांच्यासोबत विशाल भोजने आणि ऋषिकेश रायपुरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आर्थिक नियोजन कसे करावे, बचत, गुंतवणूक आणि विविध वित्तीय क्षेत्रांतील करिअर संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश देवकर यांनी केली.

यावेळी प्रा. अनंता तीतरे, प्रा. विकास गाईड, प्रा. किरण गायकवाड, प्रा. अश्विनी झनके, प्रा. अंकुश मस्के यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा सुरडकर यांनी केले, तर छायाचित्रण कु. धनश्री पाटील यांनी केले.

कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता आणि करिअर मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाला


Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help