डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.
| Date: 2026-04-11
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि मा. सचिव कु. तन्वी गोडे यांच्या प्रेरणेने तथा माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. देशमुख यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि क्रांतिकारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव व शोषणाविरुद्ध सातत्याने लढा दिला. ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा असूद’ सारख्या क्रांतिकारी पुस्तकांद्वारे त्यांनी ब्रिटिश राजवटीतील शेतकरी व दलित समाजाच्या व्यथा मांडल्या. शिक्षण हेच खऱ्या मुक्तीचे साधन आहे, असे त्यांचे प्रेरणादायी विचार आजही समाजाला मार्गदर्शन करतात. १८८८ मध्ये त्यांना ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली होती. जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि स्त्री-शोषणाविरुद्ध त्यांचा अटूट संघर्ष इतिहासात अमर आहे.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अनंता तितरे यांनी केले.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help