News-Details

डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर

| Date: 2026-10-07


डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिट, रेड रिबन क्लब आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर तसेच सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक, बुलढाणा यांच्या सहकार्याने हे शिबिर उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच श्री गणेशपूजन करून करण्यात आली. यावेळी सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक, बुलढाणा आणि उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथील वैद्यकीय पथक, एचडीएफसी बँकेचे पदाधिकारी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आदरणीय उंबरकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक श्री. राठी यांनी रक्तदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. “आपल्या सामाजिक जीवनात समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचे कार्य रक्तदानाच्या माध्यमातून करता येते. समाजाप्रती आदर्श निर्माण करणे हाच राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रमुख उद्देश आहे,” असे प्राचार्य देशमुख सर यांनी सांगितले. तर महाविद्यालयाचे शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव आढाव यांनी रक्तदात्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या रक्तदान शिबिराला दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर तसेच विज्ञान महाविद्यालय, मलकापूर येथील विद्यार्थी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध महाविद्यालयांमधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

नुकत्याच झालेल्या औषध निर्माता दिन तसेच सुरू असलेल्या औषध निर्माता दिन सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, आरोग्यसेवा आणि समाजोपयोगी उपक्रमांचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अनंता तितरे, प्रा. विकास घाईट, प्रा. साक्षी पाटील, प्रा. श्वेता राणे, प्रा. मोहिनी शिरसागर, डॉ. अंकुश मस्कर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मंगेश देवकर यांनी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर, वैद्यकीय पथक, बँक अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.


Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help