News-Details

डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस उत्साहात साजरा

| Date: 2026-09-24


डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे, सचिव कु. तन्वीताई गोडे यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. पी. के. देशमुख यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रमुख वक्ते म्हणून दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय मलकापूरचे प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय समन्वयक डॉ. देविदास दरेगावे सर उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांचे समाजाप्रती असलेले कर्तव्य, सामाजिक बांधिलकी आणि रासेयोच्या माध्यमातून समाजासाठी करता येणाऱ्या विविध उपक्रमांची उदाहरणांसह माहिती दिली आणि डॉ. गोडे फार्मसी महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.

यावेळी मागील दोन वर्षांत नियमित कार्यक्रम व विशेष शिबिरांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी रासेयो स्वयंसेवकांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून प्राप्त त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या रासेयो युनिटची क्षमता वाढवून १०० स्वयंसेवकांचे युनिट मंजूर झाल्याबद्दल प्राचार्यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. व्ही. एस. अढाव, माजी रासेयो अधिकारी डॉ. मंगेश देवकर, रासेयो अधिकारी प्रा. अनंता तीतरे, प्रा. विकास घाईट, डॉ. अंकुश मस्कर, महिला रासेयो अधिकारी प्रा. साक्षी पाटील, प्रा. श्वेता राणे, प्रा. मोहिनी शिरसागर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वयंसेविका प्रतिक्षा सुरळकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अनंता तीतरे यांनी केले. समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help