| Date: 2026-05-25

इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. योगेंद्रजी गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने सामाजिक दायित्व जागृत करणारा उपक्रम राबविला. सेवातीर्थधाम वृद्धाश्रम, दाताळा येथे आयोजित या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळे व अत्यावश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. समाजातील निराधार व ज्येष्ठ नागरिकांना निवारा, अन्न, आरोग्यसेवा आणि मानसिक आधार देणाऱ्या सेवातीर्थधाम वृद्धाश्रमाचे या परिसरात विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी हा उपक्रम हाती घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख, शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव आढाव तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त झाला. विद्यार्थ्यांनी वृद्धांना प्रेमाने फळे व औषधे दिली. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी, ज्येष्ठ नागरिकांबद्दल आदर आणि सेवाभावी कार्याचे महत्त्व याविषयी संदेश दिला गेला. योगेंद्रजी गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य करताना संस्थेने समाजातील वृद्धांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे
Connecting Aspirations, Engineering Excellence