| Date: 2025-03-06

संस्थेचे अध्यक्ष माननीय योगेंद्रजी गोडे साहेब आणि सचिव माननीय तन्वी ताई गोडे यांच्या प्रेरणेने डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दत्तक ग्राम कुंड खुर्द येथे श्रमसंस्कार शिबिर प्रारंभ झाले. कुंड खुर्द येथील जि प प्राथमिक शाळेत आयोजित या शिबिराच्या प्रारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंड खुर्द सरपंच वैशाली पाटील ग्राम पंचायत सदस्य मनोहर वराडे, राकेश पाटील, पोलीस पाटील प्रवीण वराडे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक झनके , मुख्याध्यापक संजय पाटील सर, शैक्षणिक प्रशासक डॉ.वैभव आढाव, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनंता तीतरे, रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. साक्षी पाटील,प्राध्यापक मंगेश देवकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, विद्येची देवता मा सरस्वती व वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला प्रतिमेला पुष्पहार अर्पणाने कार्यक्रमचा प्रारंभ झाला. प्रास्तविक रासेयो समन्वयक प्रा. मुकेश बाभुळकर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा, शिबिरा अंतर्गत राबवले जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्या डिजिटल इंडिया या संकल्पने विषयी माहिती दिली. आदर्श गाव ते सक्षम राष्ट्र हे शिक्षणरुपी सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कसे घडवावे, त्यासाठी लागणारे गुण कौशल्य, समाजसेवेत असलेले आपले कर्तव्य याची जाणीव करून देऊन श्रमसंस्कार शिबिराचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून मार्गदर्शन केले. यावेळी गावाच्या विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत या उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाचा समारोप हा कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनंत तीतरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हिमांशू येवले यांनी केले यावेळी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Connecting Aspirations, Engineering Excellence